Vivekanand Homeopathic Clinic Karad Maharashtra

 आजार व उपचार :-

सध्या आजारांचं वाढणारे प्रमाण ही येणाऱ्या काळासाठी चिंतेची बाब आहे. शरीर प्रकृती कमकुवत होत असून शरीराची आजाराला प्रतिकार करण्याची क्षमता कमी होत आहे. आजारातून पूर्णपणे आराम मिळण्याऐवजी उपचारांमुळे आजार तात्पुरता कमी होऊन नंतर पुन्हा पुन्हा त्रास सुरू राहतो.

अशा प्रकारच्या जुनाट आणि मुरलेल्या आजारांसाठी होमिओपॅथी मध्ये सुरक्षित व खात्रीशीर उपचार उपलब्ध आहेत. 

प्रकृतीमध्ये दोष असल्याशिवाय कोणताही आजार तयार होत नाही किंवा वाढत नाही. होमिओपॅथिक उपचारांमध्ये आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी आतून शरीरशुद्धी करून प्रकृतीमधील आजाराला पोषक असणारा दोष नाहीसा केला जातो. शरीरशुद्धीमुळे पेशींचे आरोग्य चांगले राहते. निरोगी आणि सुदृढ पेशींमुळे शरीर निरोगी राहिल्याने आजार कमकुवत  होतो व आजार पुन्हा पुन्हा होण्याची सवय बंद होते. 

जुनाट आजार पूर्णपणे बरा होणे की एक प्रक्रिया आहे यामध्ये शरीर प्रकृती नुसार कमी अधिक वेळ वेळ लागू शकतो. प्रामाणिकपणे औषधांचे नियम सांभाळून आजार बरा करण्यास शरीराला थोडा वेळ दिला आणि विश्वासपूर्वक नियमित औषधे घेतली तर सर्व प्रकारचे जुनाट व दीर्घकालीन आजार होमिओपॅथिक उपचाराने सावकाश परंतु  पूर्णपणे बरे होतात हा अनुभव आहे. 

उपचार उपलब्ध:-

मानसिक तक्रारी 

 पोट विकार

स्त्रियांच्या तक्रारी 

श्वसनाचे विकार

सांधे व स्नायूंच्या तक्रारी  

त्वचा विकार  

मणका विकार 

मूत्रविकार     

मुलांचे आजार 

मेंदू विकार 

 कान नाक घसा

डोळ्यांच्या तक्रारी

हृदय व रक्तवाहिनीच्या तक्रारी

मधुमेह रक्तदाब थायरॉईड लठ्ठपणा कॅन्सर तसेच सर्व प्रकारच्या अनुवंशिक तक्रारी.


Comments

Popular posts from this blog

Vivekanand Homeopathic Clinic

Vivekanand Homeopathic Clinic Karad